Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आ. अनिल पाटलांच्या स्थानिक विकास निधीतून रूग्णालयास साहित्य प्रदान

अमळनेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयास व आरोग्य विभागास आमदार स्थानिक विकास निधीतून १० लाखांचे साहित्य तालुका आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालय पालिका रुग्णालय यांच्याकडे आमदार अनिल पाटील यांनी सुपूर्द केले आहे.

ग्रामीण रुग्णालयास व आरोग्य विभागास आमदार स्थानिक विकास निधीतून १० लाखांचे साहित्य तालुका आरोग्य विभाग आणि ग्रामीण रुग्णालय पालिका रुग्णालय यांच्याकडे आमदार अनिल पाटील यांनी सुपूर्द केले आहे.
या माध्यमातून आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आतापर्यंत आमदार स्थानिक विकास यात एक कोटी रुपयांचा निधी कोरोनावर खर्च केला आहे.

यावेळी कोविड १९ अँटीजेन चाचणीसाठी शहरी भागासाठी ६ लाख व ग्रामीण भागासाठी ४ लाख एकुण १० लाख चाचणी किट उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत. त्यापैकी शहरी भागासाठी एकुण ६७००० अँटिजेन किट आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते पालिका मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांना ग्रामीण रुग्णालय येथे सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.प्रकाश ताळे, पालिका प्रशासन अधिकारी संजय चौधरी, पालिका रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास महाजन, डॉ.आशिष पाटील, डॉ.अतुल चौधरी विनोद कदम, प्रविण पाटील, सचिन पाटील, ज्ञानेश्‍वर कुमावत आदी उपस्थित होते.

Exit mobile version