Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरच्या मंगळग्रह सेवा संस्थेला शासनाचा पर्यटन मित्र पुरस्कार प्रदान

अमळनेर प्रतिनिधी | येथील मंगळग्रह सेवा संस्थेला राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयातर्फे पर्यटन दिनानिमित धार्मिक क्षेत्रात पर्यटन वाढीसाठी भरीव योगदान दिल्याबद्दल शासनाचा पर्यटन मित्र हा पुरस्कार नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे देण्यात आला.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

याबाबत वृत्त असे की, कोरोनामुळे मागील दिड वर्षांपासून सर्वच क्षेत्राला कमी – अधिक स्वरूपाचा आर्थिक फटका बसला आहे. त्याला पर्यटन क्षेत्रही अपवाद राहिले नाही. या पार्श्वभूमीवर पर्यटन वाढीला पुन्हा एकदा चालना देण्यासाठी शासनामार्फत कृषी,धार्मिक,ऐतिहासक,सायकलिंग,ग्रामीण कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढीसाठी प्रयत्नशील असणार्‍या विविध क्षेत्रातील व्यक्ती संस्थाना पर्यटन मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या अनुषंगाने मंगळग्रह सेवा संस्थेला पर्यटन मित्र पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर पोलीस आयुक्त दीपक पांडे,उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण,पर्यटन संचालनालयचे उपसंचालक नितीनकुमार मुंडावरे,उपअभियंता ज्ञानेश्वर पवार,ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनचे राजेंद्र बकरे,नितीन सोनवणे,जयेश तळेगावकर, पत्रकार रमेश पडवड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुंडावरे , बकरे , पडवळ व पांडे यांनी मार्गदर्शन केले.पुरस्कारार्थी म्हणून मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले यांना मनोगताची संधी मिळाली. त्यांनी धार्मिक पर्यटनाचे स्वरूप , व्याप्ती व अर्थकारण विशद केले . मंगळग्रह मंदिराच्या धार्मिक पर्यटनाच्या नेत्रदीपक यशाचे गमकही त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन.पाटील,सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम , खजिनदार गिरीश कुलकर्णी,विश्वस्त अनिल अहिरराव ,डी. ए.सोनवणे तसेच कन्स्ट्रक्शन कन्सल्टंट संजय पाटील सेवेकरीआर.जे.पाटील,उमाकांत हिरे, राहुल पाटील,भूषण पाटील उपस्थित होते.

Exit mobile version