रफूचक्कर होण्याआधी तिने घरून नेले रोकडसह दागिने !

अमळनेर प्रतिनिधी | येथून आपल्या प्रियकरासह रफूचक्कर झालेल्या तरूणीने आपल्या घरून दागिने आणि रोख रकमेसह एकूण १० लाख ८० हजारांचे ऐवज सोबत घेऊन पलायन केल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

या संदर्भात माहिती अशी की, शहरातील साईश्रध्दा कॉलनीतील एक तरूणी आपल्या प्रियकरासोबत २५ नोव्हेंबर रोजी पळून गेली आहे. दरम्यान, या तरूणीने घरून दागिने आणि रोकड नेल्याची माहिती देखील समोर आली आहे. या घटनेनंतर मुलीच्या आईने घरात तपासणी केली असता ३ लाख २० हजार रुपयांच्या प्रत्येकी ४ तोळ्यांच्या दोन पोत, तसेच चार चार तोळ्यांचे ३ लाख २० हजारांचे दोन हार, साडे तीन तोळ्यांच्या एक लाख ४० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या साखळ्या आणि रोकड असा १० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून प्रेमी युगुलासह पाच जणांवर अपहरणासह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेला तणाव निवळला असून आता गायब झालेल्या युगलाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Protected Content