दोन गटांमध्ये हाणामारी : गुन्हे दाखल

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील लोणी खुर्द येथे दोन गटांच्या झालेल्या हाणामारीत परस्परविरोधीत दाखल फिर्यादीनुसार दंगलीसह ऍट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तालुक्यातील लोणी खुर्द येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाली. लोण खुर्द येथील सरपंच विकास पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार, समाधान शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली. याचा राग आल्याने १८ रोजी सकाळी विकास शिंदे, बापू पाटील, साधनाबाई पाटील, महेंद्र शिंदे, नीलेश शिंदे, चुनीलाल पाटील, बापू पाटील, आदित्य पाटील, संदीप पाटील, सुशील पाटील, ज्ञानेश्वर पाटील हे लाठ्या काढ्या घेऊन समाधान शिंदे यांच्या घरासमोर आले. तसेच शिंदे यांच्या घरात घुसून महेंद्र याने गुलाबराव पाटील यांचा दात पाडला व लोखंडी सळईने पाठीवर वार केला. लगेच नीलेश याने काठीने डोक्यावर मारून रक्तबंबाळ केले. विकासने दगडाने मारहाण करून दुखापत केली. संशयितांनी समाधन शिंदे यालाही मारहाण केली. तसेच समाधानच्या आजी विमलबाई आधार पाटील व मालुबाई हिरामण पाटील यांनाही हात पिरगळून मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, दुसर्‍या गटातील खंडेराव भिल यांनीदेखील फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार अशोक पाटील याने जमाव जमवून खंडेराव भिल यांच्या घरी १९ रोजी रात्री जातिवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच घर पेटवण्याचा प्रयत्न केल्याने अशोक पाटील, भीमराव पाटील, दिलीप पाटील, समाधान शिंदे, भूषण पाटील, बाळासाहेब पाटील, रवींद्र पाटील, हर्षल पाटील, श्रीकृष्ण पाटील, हिरामण पाटील, हंसराज पाटील, किसन पाटील या १२ जणांवर दंगलीसह ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला.

Protected Content