जवान गणेश सोनवणे यांच्या अंत्यसंस्काराला लोटला जनसागर

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील पातोंडा येथील रहिवासी जवान गणेश भिमराव सोनवणे यांचे जम्मू काश्मीर मधील सांबा येथे सेवेत असतांना आकस्मिक निधन होते. त्यांच्या पार्थिवावर रात्री अंत्यसंस्कार झाले. याप्रसंगी हजारोंच्या जनसमुदायाने त्यांना अखेरचा निरोप दिला.

याबाबत वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील जवान गणेश सोनवणे-पाटील यांचा कर्तव्यावर असतांना अपघाती मृत्यू झाला. गणेश सोनवणे हे १४ मराठा बटालियन मधे सेवेत कार्यरत होते. त्यांचे पार्थिव गुरूवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान त्यांच्या मूळगावी म्हणजे पातोंडा येथे दाखल झाले.शासकीय इतमामात त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणेश सोनवणे यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यासाठी गावकर्‍यांनी मानवी साखळी तयार करीत मोठा तिरंगा बनवून गावातून(रॅली) मिरवणूक काढली.ठिकठिकाणी महिलांनी पुष्पवृष्टी केली. देशभक्तीपर गीतं वभारत माता की जय, अशा घोषणानी पातोंडा गाव दणाणून गेले होते.जवान गणेश सोनवणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण तालुक्यातुन हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी सैन्यदलातील, पोलीस खात्यातील अधिकारी तसेंच महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content