Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरच्या आर्मी स्कूलमध्ये अनोखा निषेध

अमळनेर प्रतिनिधी । येथील विजयनाना पाटील आर्मी स्कुलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा अनोख्या पध्दतीत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी छोट्या जवानांनी मानवी साखळीने HATE हा शब्द तयार करून तीव्र निषेध केला.

त्यानंतर शहीद जवानांना प्राचार्य पी.एम. कोळी व सुभेदार मेजर नागराज पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. सुभेदार मेजर नागराज पाटील व शरद पाटील यांनी हल्ल्याबाबत माहिती दिली. यावेळी हवालदार डी.पी. बोरसे, नायब सुभेदार भटू पाटील आदींसह शिक्षक, शिक्षिका व शिक्षेकतर कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर शहीद झालेल्या जवानांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. बंदूकधारी छोट्या जवानांनी सशस्र सलामी देऊन जवानांना आदरांजली वाहिली.

Exit mobile version