Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पोस्को अंतर्गत ‘या’ नराधमाला १२ वर्षांची शिक्षा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विवाहाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला अमळनेरच्या न्यायालयाने १२ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.

धरणगाव तालुक्यातील नारणे येथील रहिवासी असणार्‍या शरद सखाराम भिल (वय २४) याला आज अमळनेर न्यायालयाने पोक्सो अंतर्गत बारा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.सदर आरोपी याने मे २०१९ ते मार्च २०२० चे दरम्यान याने त्याचे पहिले लग्न अस्तीत्वात असतांना पिडीता ही अज्ञान असतानाही तिला लग्नाचे आमिष दाखवून पिडीतेला तिच्या पालकाच्या रखवालीतुन पळवून नेले. तिच्याशी प्रेम संबंध ठेवुन वेळोवळी जंगलात व चहार्डी येथे सुमारे एक वर्षे शारीरीक संबंध केलेत व त्यातुन पिडीता हिला दिवस गेले. मात्र आरोपी याने लग्नास नकार दिला होता. या संदर्भात सदर पिडीतेने ता.१९ जून २०२० रोजी आरोपी विरुध्द चोपडा शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केलेली होती.

या अनुषंगाने न्यायालयात पिडीतेने आरोपी विवाद खटला दाखल केला. खटला प्रलंबित असताना पिडीतेने एका लहान बालकास जन्म दिला होता. जिल्हा न्यायाधीश पी. आर. चौधरी यांचे पुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले त्यात सरकारी वकील ऍड आर.बी. चौधरी यांनी एकुण ०९ साक्षीदार तपासले. त्यापैकी पिडीताची साक्ष,सरकारी पंच, साक्षीदार उमा सुरेश भिल व डॉ. पंकज रमण पाटील, यांची साक्ष व न्यायवैज्ञानिक विभाग नाशिक यांचेकडील आरोपी, पिडीता व लहान बालकाचे डि.एन.ए नमुने जुळून आल्याने व रक्त तपासणीचे अहवाल यात महत्वाचे ठरले.

तपासी अधिकारी मनोज पवार यांची साक्ष ग्राह्य धरून आरोपीस सदरचा खटल्या कामी आलेल्या पुराव्याने गुन्हा सिद्ध झाले. गुन्हा भादंवि कलम ३६३, ३६६ मध्ये व पोक्सो ऍक्ट ४५) अंतर्गत १२ वर्षे सश्रम कारावास ठोठावण्यात आला आहे. या कामी पैरवी अधिकारी, उदयसिंगराव साळुंखे,पो.कॉ.हिरालाल पाटील, तसेच पो.कॉ. नितीन कापडणे शहर पोलीस स्टेशन यांनी काम पाहिले.

Exit mobile version