शेतकर्‍यांच्या भरपाईसाठी आप करणार धरणे आंदोलन

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळावी या मागणीसाठी आम आदमी पक्षाने धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

आम आदमी पक्षाची तालुका पातळीवरील बैठक डॉ. रूपेश संचेती यांच्या रुग्णालयात घेण्यात आली. या बैठकीत अमळनेर तालुका आम आदमी पार्टीच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यात तालुका संयोजकपदी बहादरवाडी येथील संतोष पाटील यांची व तालुका सचिवपदी भूपेंद्र पाटील आणि सहसचिवपदी नाना पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच याप्रसंगी सभासद नोंदणी अभियान राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली. आम आदमी पक्षाची अमळनेर शहर व तालुक्यात शाखा स्थापन करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. आगामी महिन्यात शहरात व ग्रामीण भागात संघटनेच्या शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच

दरम्यान, पीक विमा व अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीसाठी ९ मे रोजी धरणे आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले. या बैठकीला माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील, डॉ. रूपेश संचेती, धनंजय सोनार, प्रा. सतीश बडगुजर, आप्पा दाभाडे, योगेश पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content