Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मास्क सक्ती नसली तरी प्रवासात मास्कचा वापर करा- रेल्वे प्रशासन

मुंबई, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्यस्थितीत  महाराष्ट्रात संथगतीने  करोना संसर्गाचे रुग्ण वाढत आहेत. यावर स्थानिक स्तरावर उपाय योजना केल्या जात असताना रेल्वे प्रशासनाने देखील रेल्वे प्रवाशांनी प्रवासा दरम्यान मास्क लावण्याच्या सूचना केल्या आहेत.

देशभरात करोना संसर्ग रुग्णांची काही प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येनंतर खबरदारी म्हणून रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी पुन्हा मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार रेल्वे प्रवास करताना प्रवाशांनी आवश्यक त्यावेळी प्रवासादरम्यान मास्कचा वापर करावा, अशा सूचना यातून केल्या आहेत. मात्र प्रवाशांना ही मास्क सक्ती नाही, असे स्पष्ट केले आहे.

रेल्वे मंत्रालयाने यासंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध केले असून, देशभरातील रेल्वेच्या सर्व विभागांना पाठवण्यात आले. रेल्वे स्थानकात प्रवेश करतेवेळी अथवा वावरताना तसेच प्रवासात मास्कचा वापर प्रवाशांनी करावा, असे यात नमूद करण्यात आले आहे. मध्य, पश्चिम रेल्वे स्थानकांवर देखील स्थानिक रेल्वे प्रशासनाकडून उद्घोषणांद्वारे प्रवाशांना मास्कचा वापर करण्याचे आवाहनही केले जाणार आहे. सध्या महाराष्ट्र राज्यात मास्कसक्ती हटवण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version