Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी नराधमास 10 वर्षाची शिक्षा

Landmark Supreme Court Judgment Mary Roy v. The State of Kerala 1

जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयाने नराधमास साक्षी व पुराव्यांवरून दोषी ठरवून १० वर्षाची सक्तमजुरी, २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद सुनावली आहे.

याबाबत माहिती अशी की, वडगाव लांबे येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातील सागर पितांबर कोळी वय २६ याने लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेल्याची घटना दि.२१ ऑक्टोबर २०१४ रोजी घडली होती. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादवी कलम ३६३, ३६६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीसांनी तपास करून अल्पवयीन मुलीसह सागर पितांबर कोळी या तरुणाला ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणीनंतर या गुन्ह्यात दि.२३ ऑक्टोबर रोजी भादवल कलम ३७६ सह बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४, ६ अन्वये गुन्हयात कलम वाढविण्यात आले होते. मेहुणबारे पोलीस स्टेशनचे सपोनि जयवंत सातव यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

वैद्यकीय पुरावांसह साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात सरकारपक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमाकांत सोनवणे, ॲड. शिला गोंडबे यांनी प्रभावी युक्तीवाद केला. वैद्यकीय पुराव्यांसह डीएन एक्सपर्ट, पीडीत वैद्यकीय अधिकारी, तपासाधिकारी यांच्या साक्षी पुराव्यावरून न्यायालयाने संशयित सागर याला भादवी कलम ३७६ खाली दोषी ठरविले. संशयित आरोपी सागर याची भादवी कलम ३६३, ३६६ या कलमाखाली सुटका करण्यात आली आहे. तर भादवी कलम ३७६ खाली १० वर्ष सक्तमजुरी व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने साधी कैद देण्यात आली आहे. सरकारपक्षातर्फे ॲड. शिला गोंडबे, रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

Exit mobile version