Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलीला पळवून नेत अत्याचार करणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी नाशिक येथून अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

तुषार पुरुषोत्तम पवार (१९) रा. कसबे वणी ता. दिंडोरी जि. नाशिक व सचिन संजय मराडे (२३) रा. खंबाळे ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक अशी दोघा तरुणांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, १९ जुलै रोजी दुपारच्या वेळी जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस तुषार पवार याने पळवून नेले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केल्याने ती गर्भवती झाली. या कामी तुषार यास त्याचा मित्र सचिन मराडे याने मदत करुन गुन्ह्यास प्रोत्साहन दिले.

या प्रकरणी सुरुवातीला एमआयडीसी पोलिस स्टेशनला पीडितेला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपासाअंती पीडितेवर अत्याचार व त्यातून ती गर्भवती झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या गुन्ह्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार वाढीव कलम लावण्यात आले आहे. तुषार पुरुषोत्तम पवार रा. कसबे वणी ता. दिंडोरी जि. नाशिक व सचिन संजय मराडे रा. खंबाळे ता. त्रंबकेश्वर जि. नाशिक या दोन जणांना एमआयडीसी पोलीसांनी बुधवार २४ नोव्हेंबर रोजी दुपारी नाशिक येथून अटक केली आहे. या गुह्याच्या तपासकामी पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील पोउनि रवींद्र गिरासे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंढे, रमेश चौधरी, मिलिंद सोनवणे, मुकेश पाटील, तुषार गिरासे आदींनी परिश्रम घेतले. अटकेतील आरोपींना उद्या गुरूवारी २५ नोव्हेंबर रेाजी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Exit mobile version