‘माझी मराठीचिये बोलू कौतुके’ सोबतच आता ‘मराठीचिये लिहू कौतुके’ – आता दुकानांच्या पाट्या मराठीतच

मुंबई वृत्तसंस्था | ”माझी मराठीचिये बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके” अशी संत ज्ञानेश्वरानी मराठी भाषेची महती वर्णली आहे. आता ‘मराठीचिये लिहू कौतुके’चा धागा पकडत छुप्या पळवाटा बंद करत आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातही ‘मराठी भाषेचा प्रचार प्रसार व्हावा या निमित्तानं ‘मराठी भाषा पंधरवाडा सप्ताह’ साजरा केला जात आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे ‘मराठी पाऊल पडते पुढे’ अशी भावना जन सामन्यांच्या मानत निर्माण झाली आहे.

पूर्वी :”दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात” असा नियम राज्य सरकारने केला असल्यावरही अनेक ठिकाणच्या दुकानावरील पाट्या मात्र मराठीत नसायच्या. ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७’ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट पळवाटा शोधायचे. मात्र आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार आहेत. मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, २०१७’ यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

अनेक ठिकाणी इंग्रजीमध्ये मोठ्या अक्षरात तर मराठीत मात्र लहान अक्षरात नावं असायचं. या निर्णयाने इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकांनावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागणार आहेत.

Protected Content