Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात महिला बचत गटांना कर्ज वाटप

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील बँक ऑफ बडोदा शाखा नांद्राकडून समूह से समृद्धी या सप्ताह अंतर्गत महिला बचत गटांना बँक मॅनेजर व्यवस्थापक दिपक तोंगे व उपव्यवस्थापक आदर्श कुमार यांचे हस्ते विनातरण कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

पाचोरा तालुका येथील बँक ऑफ बडोदा शाखा नांद्रे येथे बँकेच्या “समूह से समृद्धी” हा सप्ताह अंतर्गत दि. १ आॅगस्ट २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ सुरू आहे. या सप्ताह अंतर्गत नांद्रे शाखे ने परिसरातील नांद्रे, कुरंगी, वरसाडे, माहेजी, हडसन या गावामध्ये शाखा व्यवस्थापक दिपक रामदास तोंगे यांनी रिजनल मॅनेजर अशोक वाघेला यांचे मार्गद्शनाखाली सुमारे २१ बचत गटांना २६ लाख रुपये विणातरण कर्ज मंजूर करून वाटप केले गेले. बँक ऑफ बडोदा चा हा “समूह से समृद्धी” सप्ताह परिसरातील महिला सशक्तीकरण तसेच आर्थिक व्यवहारासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जात असून बँक ऑफ बडोदा नांद्रा शाखेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Exit mobile version