Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना व संभाजी ब्रिगेडची युती : उध्दव ठाकरेंची घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीत आज शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांनी युती करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, व मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते. याप्रसंगी उध्दव ठाकरे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र मैदानात उतरणार असल्याची महत्वाची घोषणा केली. या माध्यमातून राज्यात नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येणार आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, या लढवय्या सहकार्‍यांचं मी स्वागत करतो. याप्रसंगी त्यांनी भाजपवर टीका केली. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असं ठाकरे म्हणाले. आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू. संभाजी ब्रिगेडसोबत मतभिन्नता किती आहे यापेक्षा मतऐक्य किती आहे हे महत्वाचं आहे. दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु, असंही ठाकरे म्हणाले.

Exit mobile version