Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युतीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते : चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीची घोषणा आता कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

 

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे काही वेळापूर्वीच भाजप प्रदेश कार्यालयात पोहचले आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे की, शिवसेना आणि भाजपमध्ये कोणत्याही जागेवरुन आता वाद नाही. त्यामुळे युतीवर आता जवळपास शिक्कामोर्तब झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, महायुतीची घोषणा आज रात्री १२ वाजेपर्यंत होण्याचे संकेत भाजपकडून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संयुक्तपणे युतीची घोषणा करतील, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version