Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीवरील आरोप बिनबुडाचे- सभापती कांतीलाल पाटील

चोपडा प्रतिनिधी  | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू विकण्यावरून झालेल्या वाद – विवाद बिनबुडाचे असून  ह्या वादाच्या वेळेस समितीचे सचिव जितेंद्र देशमुख हे गेले असता त्यांनी परिस्थिती बघता संबंधित शेतकऱ्यांची समजवून सदरील हमालास तंबी दिली. होती असे सभापती कांतीलाल पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत  दि.४ मार्च रोजी गहू विकण्यावरून झालेल्या वाद – विवाद बिनबुडाचे असून त्या दिवसाचा माल ओम ट्रेडींग कंपनीचा नसून कुशल इंटररप्राइजेसचा होता. सदरील इसम लायसन्स धारक  मापाडी नसून देखील माल मोजत असल्याने पहिला कट्टा मोजत असतांनाच हमाल व शेतकरी यांच्यात खाली गोणी कापण्यावरून वाद निर्माण झाला. ह्या वादाच्या वेळेस समितीचे सचिव जितेंद्र देशमुख हे गेले असता त्यांनी परिस्थिती बघता संबंधित शेतकऱ्यांची समजवून सदरील हमालास तंबी दिली. होती असे सभापती कांतीलाल पाटील यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधितांनी एक किलो कट्टी कापली जाते असे म्हटले होते परंतू त्यांनी अशी एक किलो कट्टी कापलेली एकही पावती दाखवावी त्याच्या सत्कार बाजार समितीतर्फे करण्यात येईल. हे आरोप खोटे व बिनबुडाचे आहेत. 

एका ठिकाणी बसून लिलाव करतात असा आरोप लावला गेला आहे.त्यावर सभापतीनी सांगितले की, कोरोनाचे जिल्हाधिकारीचे आदेशाचे पालन करत लिलाव होत असते यात शेतकऱ्यांची गर्दी देखिल होत नाही आणि लीलाव देखील सुरळीत होत असते तसेच अमळनेर शिरपूर बाजार समितीपेक्षा चोपडा बाजार समितीत चांगले भाव मिळत असतात. चोपडा बाजार समितीच्या सर्व व्यापारीचे दुकाने येथेच असल्याने त्याच दिवसाचा किंवा दुसऱ्या दिवसाचा धनादेश दिला जातो त्यामुळे धनादेश उशिरा आणि व्यापाऱ्यांचा घरी जावे लागते हे खोटे आहे.आवक जास्त असल्याने व्यापाऱ्यांना व हमालाना रात्री उशिरा होत असल्याने सकाळी उशिरा लिलाव सुरू होते असे सर्व आरोप खोटे आहेत. 

वांदा कमिटी निर्णय येईल. यापुढे कोणतेही वाद झाले तरी वांदा कमिटी कडे दिला जाईल. त्यासाठी इतर शेतकऱ्यांचा लिलाव न थाबवता लिलावा नंतर त्या वांदयावर निर्णय होईल यासाठी वांदा कमिटीत सहा सदस्यांची राहील त्या कमिटीचे अध्यक्ष नंदकिशोर पाटील हे राहणार आहेत.

यावेळी पत्रकार परिषदेत सभापती कांतीलाल पाटील,उपसभापती नंदकिशोर पाटील, सद्स्य राजेंद्र देशमुख, आर.बी.कंखरे, गिरीष पाटील, नितीन पाटील,सचिव जितेंद्र देशमुख, लेखापाल एन.आर.सोनवणे आदी हजर होते.

 

 

 

 

Exit mobile version