Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यातील सर्व पाच ही प्राथमिक आरोग्य केन्द्रावर औषधींचा तुटवडा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रासह तालुक्यातील जवळपास सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रूग्णांना लागणाऱ्या औषधीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने आरोग्य विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामीण क्षेत्रातील नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त व्यरण्यात येत आहे.

यावल तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केन्द्रांवर मागील काही दिवसांपासुन रुग्णांना लागणाऱ्या औषधी या मिळत नसल्याने व त्यातच उन्हाळा लागला असुन, यातच उन्हाळा सुरू असल्याने सर्वत्र उष्णता वाढलीअसतांना आरोग्य केन्द्रावर उपचारानंतर अत्य आवश्यक औषधी रूग्णांना मिळत नसल्याने रुग्णांमध्ये आरोग्य विभागाच्या कारभारा बद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रूग्णाच्या प्रश्नाकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

यावल तालुक्यात सावखेडा सिम ,साकळी, भालोद, हिंगोणा, पाडळसा असे पाच आरोग्य केंद्र आहेत. या पाचही आरोग्य केंद्रांमध्ये पुरेसा औषधीचा साठा उपलब्ध नसल्याने सध्या उष्णतेची लाट आहे. या लाटेत वारस या औषधाची अत्यावश्य गरज आहे. मात्र ही रुग्णांना मिळत नसल्याने रुग्ण वाऱ्यावर सोडले जात आहेत. त्यातच सावखेडा सिम सिम सारख्या मोठ्या आरोग्य केंद्रात डॉक्टर वेळेवर येत नसल्याने रुग्णांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. सकाळी आठ वाजता आरोग्य केंद्र उघडण्याची वेळ आहे. मात्र डॉक्टर साडेनऊ वाजेच्या दरम्यान येत आहेत. याकडे तालुका आरोग्य विभागाने या रुग्णांशी निगडीत प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

Exit mobile version