Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखिल भारतीय मराठा महिला महासंघ जिल्हाध्यक्षपदी अनिता तनपुरे

खामगाव,  प्रतिनीधी अखिल भारतीय मराठा महासंघ अंतर्गत बुलढाणा जिल्हा अखिल भारतीय मराठा महिला महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी अनिता तनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली असून  त्यांना हे नियुक्ती पत्र बुलढाणा जिल्ह्यातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी जाऊन दिले.  याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून संघटनात्मक कार्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने  बुलढाणा जिल्हा महिला महासंघाच्या कार्यकारणीची व संघटनेचे गठन करण्याचा निर्णय महासंघाच्या वतीने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठा महिला महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी अनिता तनपुरे यांची नियुक्ती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार यांनी जिल्हाध्यक्ष राम मोहिते यांच्याशी विचार विनिमय करून तीन महिन्याच्या कालावधीकरिता नियुक्ती पत्रकाद्वारे केली आहे.   या कालावधीमध्ये  जिल्हा भर महिला संघटन मजबूत करण्यासाठी सर्व जुन्या व नवीन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन कार्य करण्याचे सूचित करण्यात आले आहे.  या  तीन महिन्याच्या कालावधीतील त्यांचे  कार्य पाहून नियुक्ती कायम करण्यात येणार आहे.  नियुक्ती पत्र प्रदान करण्याच्या प्रसंगी सर्व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हा सरचिटणीस किशोर भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.  त्यांनी सांगितले की, काही दिवसां आगोदरच नेहमी सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे खरे समाजसेवक बंडूभाऊ तनपुरे यांचे कोरोना  आजारामुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने तनपुरे परिवारासह मराठा समाजाची खूप मोठी हानी झाली. या दुःखातून अनिता ताईंनी स्वतःला व स्वतःच्या परिवाराला सावरून बंडू भाऊंचे समाजसेवेचे कार्य पुढे अविरत सुरू राहावे याकरिता व समाजातील महिला भगिनीला सहकार्य करण्यासाठी समाजाप्रती आपले योग्य असे दायित्व निभवण्यासाठी स्वतःहून महिला सक्षमीकरणाची जबाबदारी स्वीकारून सर्व समाजाला अभिमान वाटावा असे कार्य करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्षपदाची दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळण्याचे तयारी स्वतःहून दर्शविल्याने त्यांचीही नियुक्ती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे असे सांगितले व सर्व समाज बांधवांच्या वतीने या पहिल्या महिला जिल्हाध्य पदाचा बहुमान मिळाल्याबद्दल सर्वांच्या वतीने  अनिता तनपुरे यांचे अभिनंदन करून त्यांच्यापुढील महिला संघटनेच्या संघटनात्मक कार्यास शुभेच्छा दिल्या.  याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष गणेश माने,  रमाकांत गलांडे, संभाजी तनपुरे, विकास चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष सुभाष शेळके, संजय शिंगारे, कल्याण गलांडे, जिल्हा सरचिटणीस किशोर भोसले,शहर अध्यक्ष राजेश मुळीक, तालुका युवक अध्यक्ष संतोष येवले, शैलेश तनपुरे, अभिषेक तनपुरे हे उपस्थित होते.

Exit mobile version