Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांची दिवसभर प्रतीक्षा

 

सांगली, वृत्तसंस्था । ऑगस्ट महिन्यात सांगलीत कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला. व्हेंटिलेटरयुक्त खाटांची कमतरता असल्याने मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज २५ ते ३० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू होत असल्याने मिरजेतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी दिवसभर प्रतीक्षा करावी लागत आहे. चिंताजनक रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांसमोर मृत्यूदर कमी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

जुलै महिन्यापर्यंत नियंत्रणात राहिलेल्या करोना संसर्गाचा ऑगस्ट महिन्यात उद्रेक झाला. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यात २६४३ रुग्णांची नोंद होती, तर ७८ रुग्णांना जीव गमवावा लागला होता. ऑगस्ट महिन्यात मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली. गेल्या महिनाभरात सांगलीत तब्बल ९७५१ नवे रुग्ण आढळले, ४७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या ४९५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ५६९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने मृत्यूदर वाढत आहे. .

Exit mobile version