Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भर दिवसा एकाला लुटले; परिसरात खळबळ

crime-2

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील साकेगाव येथील शिवारात भर दिवसा एका दुचाकीस्वाराला लुटून ८० हजारांची रोकड मोबाईल व सोन्याच्या दोन चेन घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, साकेगाव येथील विनोद परदेशी हे इसम सकाळी दहा वाजेच्या सुमारास आपल्या शेताकडे जात असतांना तीन इसामानी मोटरसायकल वर येऊन अडवून मारहाण केली. तसेच त्यांच्या कडील ८० हजार रुपये रोख,दोन सोन्याच्या चेन, एक विवो कंपनीचा मोबाईल असा ऐवज लुटून नेला आहे. अगदी दिवसा ढवळ्या घडलेल्या या लुटीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, याबाबत माहिती मिळताच गुन्हा घडल्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे,पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे व त्यांच्या सहकार्‍यांनी पोहचून तपासला सुरुवात केलेली आहे. तपसाअंती त्या गावात कामानिमित्त येणारा सोनू नावाचा भुसावळ येथील इसम यावर प्रथम दर्शनी संशय आहे.त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

Exit mobile version