Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

नवी दिल्ली वृत्तसंस्था । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज सर्वच्या सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. ही घटना पूर्व नियोजीत कट नसल्याचे नमूद करत हा निकाल सुनावण्यात आला.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर फैजाबादमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले होते. या प्रकरणाच्या चौकशीनंतर सीबीआयने ५ ऑक्टोबर १९९३ रोजी ४९ जणांवर आरोपपत्र दाखल केले होते. तब्बल २८ वर्षानंतर या प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने निकाल सुनावला आहे.

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात सीबीआयच्या आरोपपत्रात एकूण ४९ आरोपी असून यातील १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३२ आरोपी आहेत. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह आणि उमा भारती यांचा समावेश आहे. दरम्यान, आज निकाल ऐकण्यासाठी लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी, महंत नृत्य गोपाल दास, सतीश प्रधान आणि कल्याणसिंग यांचा अपवाद वगळता अन्य सर्व २६ आरोपी सीबीआयच्या विशेष न्यायालयात उपस्थित होते. यातील बहुतांश आरोपींनी निकाल सुनावण्याआधीच जामीनासाठी आवश्यक असणारी तयारी पूर्ण केली होती.

विशेष जज एस. के. यादव यांनी न्यायालयात येऊन निर्णय सुनावण्याआधी ते आपल्या चेंबरमध्ये बराच काळ होते. यानंतर त्यांनी निकाल सुनावला. त्यांनी प्रारंभीच अयोध्या येथील घटना ही पूर्वनियोजीत कट या प्रकारातील नव्हती. ही आकस्मिक घटना असल्याचे त्यांनी प्रारंभीच सांगितले. यामुळे त्यांनी सर्वच्या सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

Exit mobile version