Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गेटमनच्या सतर्कतेचे टळला मालगाडीचा अपघात

चाळीसगाव प्रतिनिधी । मालगाडीतील गार्ड डब्याचा चाकाला लागलेली आग गेटमनच्या लक्षात आल्याने मोठा अपघात टळला. चाळीसगाव स्थानकाजवळ आज ही घटना घडली.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव विभागातील खंबा क्रमांक ३४०/२०-२२ जवळ रेल्वेचे गेट आहे. आज या गेटजवळून जात असलेल्या मालगाडीतील गार्डच्या डब्याच्या चाकाला आग लागल्याने यातून धुर बाहेर येत असल्याचे या गेटवरील गेटमन गणेश पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याची माहिती संबंधीत गाडीचे गार्ड, ड्रायव्हर आणि स्टेशन मास्टरला दिली.

यानंतर तातडीने ही गाडी थांबविण्यात येऊन आग विझवण्यात आली. गणेश पाटील यांच्या सतर्कतेमुळे मालगाडीचा मोठा अपघात होतांना वाचला. यामुळे गेटमन गणेश पाटील यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version