Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अलकायदाच्या मोस्ट वाँटेड दहशतवाद्यास झारखंडमध्ये अटक

Al Queada terrurist

रांची, वृत्तसंस्था | झारखंड पोलीसांच्या एटीएस पथकाला मोठे यश लाभले आहे. जिहादच्या नावाखाली दहशतवादी कारवायांसाठी कार्यरत असलेल्या व तीन वर्षांपासून पोलिसांना हवा असलेल्या अलकायदाच्या दहशतवाद्यास त्यांनी आज (दि.२२) अटक केली आहे. मोहम्मद कलीमुद्दीन असे या मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचे नाव आहे. जमशेदपूर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात गुन्हे दाखल होते.

 

पोलीस महासंचालक एम.एल. मीना यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, कलीमुद्दीन अलकायदाचा मोस्ट वाँटेड दहशतवादी होता. त्याला टाटानगर रेल्वे स्थानक येथून अटक करण्यात आली आहे. तो भारतीय उपखंडातील तरूणांना जिहादसाठी भडकावून दहशतवादी करावायांसाठी तयार करायचा.

याशिवाय तो नव्याने भरती करण्यात आलेल्या तरुणांना दहशतवादी कारवायांच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानलाही पाठवायचा. जमशेदपूर येथील रहिवासी असेलला कलीमुद्दीन तीन वर्षांपासून फरार होता. त्याचे साथीदार मोहम्मद अब्दुल रहमन अली उर्फ हैदर उर्फ कतकी, अब्दुल सामी उर्फ उज्जन उर्फ हसन हे दिल्लीतील तिहार तरूंगात सध्या कैद आहेत. कलीमुद्दीन तरूणांना भरती करण्यासाठी उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगालबरोबरच अन्य राज्यांमध्येही सक्रीय होता. याशिवाय बांग्लादेश, दक्षिण आफ्रिका, सौदी अरबसह अन्य देशांमध्येही तो यासाठी गेलेला आहे.

Exit mobile version