Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अकुलखेडा येथे विजेच्या धक्क्याने तरूणीचा मृत्यू

akulkheda

चोपडा, प्रतिनिधी । तालुक्यातील अकुलखेडा येथील 18 वर्षीय तरूणीला नळाला आलेले पाणी भरल्यानंतर पाण्याची मोटार बंद करण्यासाठी गेली असता विजेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील अकुलखेडा येथे सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे घरातील पाणी भरून झाल्यानंतर निकिता दिलीप धनगर (वय -18) हिने पाण्याची मोटर बंद करून पिन काढत असताना अचानक तिला विजेचा जोरदार शॉक बसला याविजेच्या धक्क्याने निकिता जागीच मृत्यू झाला. राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी चालक दिलीप धनगर यांची निकिता मुलगी होती. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेबद्दल गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Exit mobile version