अखिल आदिवासी मीना महासभा संघटनेची राज्यस्तरीय बैठक

 

 

पाचोरा, प्रतिनिधी | प्रदेश अध्यक्ष रमेश जोनवाळ यांच्या अध्यक्षतेखाली विजयसिंग कायटे यांच्या निवास्थानी अखिल आदिवासी मीना महासभा संघटनेची राज्यस्तरीय बैठक पार पडली.

समाजाच्या अनेक मुद्यांवर चर्चा झाली. संघटना मजबुत करण्यासाठी समाजच्या प्रत्येक गावी जावून कार्यक्रमाचे आयोजन करुन समाजात जागृती अभियान चालावण्यावर विचार करण्यात आला.

समाजातील महिलांचे नेतृत्वाचे प्रमाण नगन्य आहे म्हणून संघटनेत महिला नेतृत्वाला अधिक वाव देण्यावर भर देण्यात आला पुढील कर्यक्रमा करिता होणारा खर्च सर्व मिळून करण्या वर एकमत झाले.

कार्यक्रम नियोजित वेळे पेक्षा एक तास उशिराने सुरू झाला. यावेळी प्रदेशसचिव सुभाष डोभाल, प्रदेश महा सचिव मदनसिंग सुंदर्डा, रेल्वे आरोग्य निरिक्षक पाचोरा स्टेशन हेमराज मीना यांनी राजस्थान आणि महाराष्ट्राच्या मीणा समाजा वर सविस्तर माहिती सांगीतली आणि संघटनेची गरज आणि समाजाच्या प्रगतीचा मंत्र दिला.

जळगांव जिल्हा अध्यक्ष दिपक शेवाळ, जामनेर तालुका सचीव भगवान बैनाडा, जामनेर तहसिल आध्यक्ष प्रकाश बैनाडा, खानदेश विभाग सचिव गोपाल चन्नावत, पाचोरा तहसिल अध्यक्ष सुरेश कायटे, गणेश कायटे, जितेंद्र कायटे विजयसिंग खोकड, अरुण गोठवाल, सोयगाव तालुका आध्यक्ष सुभाष शिहरा इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजयसिंग कायटे यांनी केले तय आभार प्रदर्शन अरुण गोठवाळ यांनी केले, अशा पध्दतीने उत्साहात मिटींग पार पडली.

Protected Content