Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर राणा पती-पत्नीला अटक 

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मातोश्रीच्या समोर हनुमान चालीसा म्हणण्यावरून दिवसभर रंगलेल्या नाट्यानंतर अखेर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अखेर अटक करण्यात आली आहे.

सकाळापासून मुंबईत सुरु असलेल्या शिवसेना विरुद्ध राणा यांच्याती सामना रंगला. यानंतर दुपारी या दाम्पत्याने फेसबुक लाईव्ह करून मातोश्री समोर हनुमान चालीसा म्हणण्याचा आग्रह सोडल्याचे जाहीर केले. नंतर पुन्हा एकदा शिवसैनिक आणि या कुटुंबात वाद झाले. यामुळे अखेर कडक पोलीस बंदोबस्तात राणा दाम्पत्यांना बाहेर काढले असून, या दोघांनाही खार येथील पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, या दोघांना खार पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांची आजची रात्र पोलीस स्टेशनमध्येच जाणार आहे.

Exit mobile version