Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टाकळी येथे अखंड हरीनाम किर्तन सप्ताहास सुरुवात

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या टाकळी येथे अखंड हरिनाम किर्तन सप्ताहास सुरुवात झाली असून किर्तन सप्ताहाचे यंदा ११ वे वर्ष आहे.

किर्तन सप्ताहला दि. ११ नोव्हेंबर मंगळवार पासून सुरवात झाली असून या सप्ताहात दैनंदिन सकाळी ५ ते ६ काकडा आरती, भजन व विष्णू सहस्त्रनाम पाठ सायंकाळी ६ ते  ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. रविंद्र महाराज, ह.भ.प. समाधान महाराज ह.भ.प. गोपाल महाराज, ह.भ.प. जितेश महाराज, ह.भ.प. सुखदेव महाराज, ह.भ.प. जीवराम महाराज, ह.भ.प. अनंतराव महाराज, ह.भ.प. किशोर महाराज या नामवंत किर्तनकारांचे किर्तन होणार आहे. दि. १६ नोव्हेंबर मंगळवार रोजी काल्याचे किर्तन व महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी किर्तन श्रवण व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन टाकळी ग्रामस्थांनी केले आहे.

 

Exit mobile version