Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या कर्णधारपदी सतत तिसऱ्यांदा आकाश धनगरची निवड

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पश्चिम विभागीय अखिल भारतीय आंतरविद्यपीठ बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यपीठ जयपूर येथे दि २५ ते २७ मार्च २२ दरम्यान, होत असून  त्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संघाचे कर्णधारपदी जैन स्पोर्ट्स अकाडमीचे आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धीबळ खेळाडू, प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच आकाश धनगर यांची निवड झाली आहे.

आकाश धनगर हे तीन राष्ट्रीय व आठ वेळा राज्यस्तरीय तसेच सलग पाचवेळेस विद्यपीठ प्रतिनिधित्व करण्याचं मान मिळवला आहे. सलग 3 वर्षे झाले विद्यपीठ कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. विद्यपीठ संघात आकाश धनगर सोबत नंदुरबार येथील वैभव बोरसे, ऋषिकेश सोनार, गौरव सोनार, ऋतिक पाटील अमळनेर याचं सहभाग आहे.

बुद्धिबळ संघटनेने केला गौरव

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे खाजिनदार फारूक शेख यांच्या अध्यक्षते खाली  एका छोटे खानी कार्यक्रमात त्यांना गुच्छ व शाल देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र आर्बिटर कमेटीचे सचिव प्रवीण ठाकरे, ज़िल्लाह बुद्धिबळ संघटनेचे रविन्द्र धर्माधिकारी,अरविंद देशपांडे, फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसिन, बास्केटबॉल प्रशिक्षक वाल्मीक पाटिल,ताइक्वांडो प्रशिक्षक अजित घारगे, बैडमिंटन प्रशिक्षक किशोरसिंग,टेबल टेनिस प्रशिक्षक विवेक आळ्वनी,समीर शेख यांची उपस्थिति होती.

 

Exit mobile version