अजून उष्णतेपासून दिलासा नाहीच !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मान्सून कर्नाटकात थबकला असतांनाच मध्य आणि उत्तम महाराष्ट्रातील उष्णतेची लाट अजून कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूची प्रतिक्षा लागलेली आहे. खरं तर यंदा पावसाळा लवकर सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तथापि, मान्सून कर्नाटकात थबकला असतांनाच सध्या राज्यात उष्णतेच्या लाटेनं हैराण केलं आहे. पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती नसल्यानं गेले चार दिवस मान्सून कर्नाटकातल्या कारवारपर्यंत येऊन थांबला आहे. तथापि, या स्थितीत लवकरच बदल होणार असून आगामी सुमारे पाच दिवसांमध्य राज्यातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे.

तर दुसरीकडे राज्यात सध्या उष्णतेची मोठी लाट सुरू असून ती अजून कायम राहण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. राज्यात विदर्भ, मराठवाडा उत्तर महाराष्ट्रासह इतरही अनेक भागांत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. उत्तरेकडून येणार्‍या कोरड्या, उष्ण वार्‍यांमुळे उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील अनेक ठिकाणी उष्णतेची किमान दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

Protected Content