Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजमेर-पूरी एक्सप्रेसला थांबा मिळावा; स्टेशन सल्लागार समितीची मागणी

Indian railway

धरणगाव प्रतिनिधी । येतील धरणगाव स्टेशन सल्लागार समितीची बैठक झाली. त्यात धरणगावसाठी अजमेर-पूरी एक्सप्रेसला थांबा मिळावा, अशी साकारात्मक अहवाल रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. धरणगाव स्टेशनवर वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात यावी. प्लेटफार्म नंबर २ वर कव्हर शेड वाढविण्यात यावा. नवीन चालू झालेल्या मेमो वेलची वेळ बदलविण्यात यावी. प्लेटफॉर्म नंबर २ कडे जाण्याच्या रस्त्याला स्ट्रीट लाइट लावण्यात यावे. स्टेशनवर फ्रूट गाडी सुरू करण्याची परवानगी द्यावी.

अमरावती एक्सप्रेसला डेली करून वातानुकूलित खुर्सी यान लावण्यात यावा. प्लेटफार्म नंबर १, २ वरील कँटीन शिफ्ट करण्यात यावे. मीटिंगमध्ये मुंबई सेंट्रल डिवीजनचे एसीएमआर परमार, सीएमआय किशोर नकाना, स्टेशन प्रबंधक ए.आर.सोनवणे, झेड.आर. यू.सी.सी. सदस्य महेन्द्र कोठारी, स्टेशन सल्लागर समितिचे सदस्य किरण वाणी, सुनील चौधरी, वाल्मीक बागुल, योगेश ठाकरे, महेंद्र बयस, अरुण कासार, जितेन्द्र ओस्तवाल उपस्थिति होते. सकारात्मक चर्चा होऊन सदरहू मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

Exit mobile version