Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्यथित होऊन दिला अजित पवारांनी राजीनामा- शरद पवार

पुणे प्रतिनिधी । शिखर बँकेच्या घोटाळ्यात आपले नाव आल्याने व्यथीत होऊन अजित पवार यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती आज खुद्द शरद पवार यांनी दिली. तथापि, या राजीनाम्याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याची पुस्तीदेखील त्यांनी जोडली.

आज सायंकाळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. अगदी कुणालाही न कळवता त्यांनी राजीनामा देऊन ते नॉट रिचेबल झाले. यामुळे राजकीय वर्तुलात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणी तर्क-वितर्कांना उधाण आले. या पार्श्‍वभूमिवर, आज पुण्यात शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, अजित पवार यांच्या राजीनाम्याबाबत मला काहीही माहिती नाही. तथापि, त्यांनी (अजित पवार यांनी) आपल्या कुटुंबासोबत केलेल्या चर्चेचा तपशील समजला आहे. यात ते शिखर बँक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून ते अस्वस्थ होते. आपण काहीही चुकीचे केले नसल्यावर ते ठाम होते. तथापि, यामुळे आपल्यावर (शरद पवार यांना) गुन्हा दाखल झाल्याने ते जास्त अस्वस्थ झाले होते. यामुळे त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असून यानंतर शेती करण्याचा मानस त्यांनी आपल्या कुटुंबियांजवळ बोलून दाखविल्याची माहिती शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान, शरद पवार यांना कोणताही सुगावा लागू न देता अजितदादांनी राजीनामा दिल्याचे या पत्रकार परिषदेतून अधोरेखीत झाले. ते या निवडणुकीत उतरणार नसल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version