Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शरद पवारांना भेटण्यासाठी अजितदादा सिल्व्हर ओकवर !

pawar pawar

मुंबई प्रतिनिधी । आजच्या राजकीय नाट्यानंतर अखेर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहेत.

आज दुपारी अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर मुख्यमंत्र्यांनीही राजीनामा दिला. यामुळे हे सरकार अवघ्या चार दिवसांमध्ये बरखास्त झाले. यानंतर रात्री सव्वानऊच्या सुमारास अजित पवार हे शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेटीसाठी गेले. विशेष बाब म्हणजे प्रसारमाध्यमांच्या कॅमेर्‍यांना चुकवत ते अक्षरश: पळून घरात गेले. यामुळे आता या भेटीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version