Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवारांची विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी निश्‍चीत

मुंबई प्रतिनिधी । पक्ष नेतृत्वाला अंधारात ठेवून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली असून याबाबत बैठकीनंतर घोषणा होणार आहे.

अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांना हादरा देऊन पक्षात फुट पाडली. त्यांनी थेट भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी घेतली. यामुळे राष्ट्रवादीला जोरदार हादरा बसला. या पार्श्‍वभूमिवर, पक्षाच्या बैठकीत यावर मंथन करण्यात येऊन अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला. असून याबाबत बैठकीनंतर घोषणा होणार आहे.

Exit mobile version