Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवार यांचा फोन हॅक करून पदाधिकाऱ्याला पैशांची मागणी

ajit 5

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा फोन हॅक करून मुंबईतील एका पदाधिकाऱ्याला पैशांची मागणी करून गंडविण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विश्वस्त नरेंद्र राणे यांना रविवारी सकाळी पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नंबरवरून फोन आला. त्या फोनवर कुणाल नावाची व्यक्ती बोलत होती. ‘सध्या दादा पुण्यात आहेत. मात्र एका व्यक्तीला मुंबईत तातडीने मोठी रक्कम अदा करायची आहे. तुम्ही या बँक खात्यावर इतकी इतकी रक्कम तत्काळ भरण्याची व्यवस्था करा,’ असा निरोप दिला आहे,असे सांगण्यात आले. राणे यांनी लगेच होकार कळवला आणि पैशाची व्यवस्था करण्यासाठी १० मिनिटे वेळ मागितला. राणे यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी लागलीच अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकांना फोन लावला. तेव्हा अजित पवार पुण्यात असल्याचे कळले. राणे यांनी अर्ध्या तासाने अजित पवार यांना फोन लावला, काही वेळातच पैशाची व्यवस्था करतो, असे सांगितले. मात्र अजित पवार यांनी ‘मी तुम्हाला फोन केलेलाच नाही, माझा फोन माझ्याकडे आहे. कोणत्या पैशाचे बोलता,’ असा प्रतिप्रश्न अजित पवार यांनी केला. त्यानंतर पवार यांचा फोन हॅक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर राणे यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर क्राइमकडे यासंदर्भात तक्रार दिली असून फोनचे सर्व कॉल डिटेल्स दिले आहेत.

Exit mobile version