Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवार समर्थक आणि राष्ट्रवादीतून निलंबीत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून आज निलंबीत करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी जून महिन्यात शिवसेनेत जे झाले होते, अगदी त्याच प्रकारे आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात सत्तासंघर्ष सुरू झालेला आहे. काल अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यानंतर पक्षाच्या मालकीवरून कायदेशीर लढाई सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले होते. आणि झालेदेखील तसेच.

खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना पत्र लिहून पक्षातून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी केली होती. या मागणीला शरद पवारांनी मंजुरी दिली असून पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. तसेच काल शपथ घेतलेल्या नऊ आमदारांवर पक्षशिस्त भंग केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, जयंत पाटल यांनी अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, अनिल पाटील, संजय बनसोडे, अदिती तटकरे आणि धर्मारावबाबा अत्राम यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. तसेच, या शपथविधी सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व नेतेही पक्षाकडून बडतर्फ करण्यात आले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रक काढले आहे.

Exit mobile version