Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जेट एअरवेजवर आर्थिक संकट ओढावल्याने हवाई प्रवास महागला

TH16JETAIRWAYS

मुंबई वृत्तसंस्था । विमान वाहतूक करणारी जेट एअरवेज आर्थीक संकट ओढावल्याने काल मंगळवारी अनेक विमानाचे उड्डाने रद्द करण्यात आले होते. विमान रद्द झाल्याने प्रवश्यांना इतर विमान कंपन्यांकडे आपला मोर्चा वळविला असून देशातील सर्व प्रमुख ठिकाणाचे भाडे तब्बल सहा पटीने वाढविण्यात आले. याचा परिणाम सुट्टींमध्ये जाणाऱ्या पर्यंटकांवर आता हवाई प्रवासासाठी आर्थीक बोजा पडणार आहे.

देशातील सर्वच भागात परिक्षांचा कालावधी सुरू आहे. पुढील महिन्यात निवडणुका आटोपल्यानंतर पुढील काळात विदेशात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी उसळणार आहे. काल मंगळवारी जेट एअरवेजच्या एकुण 119 विमानांपैकी 36 विमाने उड्डाणे केली बाकीची रद्द करण्यात आली होती. जेटने अचानक विमाने रद्द केल्याने त्या विमानांतील प्रवासी दुसऱ्या विमान कंपन्यांकडे वळले. यामुळे एका रात्रीत विमान भाडे वाढले. मुंबई- दिल्ली, मुंबई- बंगळूरू, मुंबई-कोलकाता आणि चेन्नई सारख्या व्यस्त मार्गावर विमान भाडे कमालीचे महागले आहे. जेथे या मार्गाचे भाडे 5 हजार होते ते एका रात्रीत 30 हजारावर गेले आहे.  मंगळवारी झालेल्या भाडेवाढीमुळे मुंबई-दिल्ली प्रवासासाठी 15,518 रुपये खर्च करावे लागत आहेत. गेल्या वर्षी हेच भाडे 6577 रुपये भाडे होते. याचप्रमाने मुंबई-चेन्नई यात्रेसाठी 5369 रुपयांऐवजी 26 हजार रुपये तर मुंबई- बंगळूरूसाठी 2600 ऐवजी 16 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

केवळ जाण्याचेच भाडे नाही तर मागे येण्याच्या भाड्यातही मोठी वाढ झाली आहे. मुंबई-दिल्ली-मुंबईचे भाडे 14 हजार ते 36 हजार रुपये झाले आहे. तर दिल्ली-लखनऊ-दिल्ली प्रवासाचे भाडे 8 हजार ते 23799 रुपये झाले आहे. मुंबई-लखनऊ-मुंबई प्रवासचे भाडे 28660 रुपयांपासून 47114 रुपये एवढे झाले आहे. मुंबई-जम्मू-मुंबईचे भाडेही 16,323 रुपयांपासून 26,817 रुपये झाले आहे. मुंबई-पटना-मुंबई प्रवासाचे भाडे 34,494 रुपयांपासून 62964 रुपयांवर पोहोचले आहे. दिल्ली-पटना-दिल्लीसाठी 22,388 रुपये ते 42,968 रुपये एवढे झाले आहे. दिल्ली-डेहराडून-दिल्ली प्रवासासाठी 7,554 रुपये ते 12028 रुपये मोजावे लागत आहेत. दिल्ली-चंडीगढ़-दिल्लीचे भाडे 20 हजार ते 28 हजार रुपये एवढे झाले आहे.

Exit mobile version