Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘एयर प्युरिफायर’ करणार कोरोनाच्या विषाणूचा खात्मा

कानपूर । कोरोनासह अन्य विषाणूंचा हवेतच नायनाट करण्यास सक्षम असणारे एयर प्युरिफायर आयआयटीच्या संशोधकांनी विकसित केले आहे.

आयआयटी कानपूर येथील आयआयटीच्या संशोधकांनी कोरोनाच्या प्रतिकारासाठी उपकरण विकसित केले आहे. घातक विषाणूंचा हवेतच बंदोबस्त करणार ‘ऑण्टिमायक्रोबायल एअर प्युरिफायर’ नावाचे उपकरण तयार करण्यात आले आहे.

रुग्णालयात रुग्णांच्या आजूबाजूच्या हवेमध्ये असणारे व्हायरस बाहेर कसा काढायचा हा प्रश्न असतो. त्यावेळी युव्ही लाइट किंवा केमिकल स्प्रेचा वापर केला जातो. हे दोन्ही पर्याय मनुष्यासाठी हानीकारक असतात. हे लक्षात घेऊन आयआयटीच्या संशोधकांनी हे एक नवीन यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र संपूर्णपणे सुरक्षित आहे.

जेव्हा जिवंत विषाणू या एअर प्युरिफायरमध्ये येतात तेव्हा त्यांचे डिऑक्टिव्हेशन सुरू होते. या विषाणूंना खास फिल्टरद्वारे पकडून ते सिस्टीमद्वारे डिऑक्टिव्हेट केले जातात. हा प्युरिफायर कोरोना व्हायरस आणि फंगससारख्या छोटे कणदेखील डिऑक्टिव्हेट करू शकतो. यामुळे आजूबाजूची हवा 99 टक्के शुद्ध राहते. हे यंत्र हवेतील कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया डिऑक्टिव्हेट करण्यास सक्षम असल्याचा दावा आयआयटीच्या संशोधकांकडून केला जात आहे.

Exit mobile version