Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नाहाटा महाविद्यालयात एड्स जनजागृती सप्ताह संपन्न

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील कला, विज्ञान आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रिबीन क्लब व आय. सी. टी. सी. केंद्र ग्रामीण रुग्णालय व वरणगाव यांच्याद्वारे एड्स जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, पथनाट्य व रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. आज रोजी या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील हे होते. व्यासपीठावर  ग्रामीण रुग्णालय वरणगाव येथील  सौ. ज्योती गुरव, सौ भावना प्रजापति ,सौ. सुनंदा कोळी, प्रा. शिवानी माळी, श्री. निलेश दांडवेकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.आर.एस.नाडेकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.विलास महिरे व महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.ममताबेन पाटील हे उपस्थित होते. इतर प्राध्यापक बंधू-भगिनी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर यांनी सादर केले. महाविद्यालयाचा रेड रिबीन क्लब द्वारे आयोजित निबंध स्पर्धा, पोस्टर्स स्पर्धा, पथनाट्य स्पर्धा यातून एड्स जनजागृती करण्यात आली. या स्पर्धेमधील सहभागी विद्यार्थ्यांच्या पोस्टरचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. त्यातून विद्यार्थ्यांच्या वकृत्व व कलात्मक गुणांना वाव मिळाला यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगत स्पष्ट करताना प्राचार्य प्रा. डॉ. एस.व्ही. पाटील यांनी एड्स बाबत जागरूकता हीच काळाची गरज असल्याचे म्हटले.

एड्स जनजागृती सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील निकाल खालील प्रमाणे.

1. निबंध स्पर्धेत प्रथम कुणाल प्रमोद नेमाडे तर द्वितीय प्रांजल गोपाळ बारी यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

2. पोस्टर स्पर्धेमध्ये प्रथम राखी सुरळकर द्वितीय क्रमांक आदित्य तायडे यांचा आला. त्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

3. पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली. त्यामुळे प्रफुल वाघमारे व ग्रुप यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.

समुपदेशक सौ.ज्योती गुरव  यांनी एड्स बाबत विविध प्रश्नांच्या उत्तरांमधून विद्यार्थ्यांना जागृत केले. एड्स व एचआयव्ही यातील फरक स्पष्ट करून विद्यार्थ्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना एच आय व्ही / एड्स  जनजागृती पर शपथ दिली सौ. भावना प्रजापति यांनी विद्यार्थ्यांचे एचआयव्हीची टेस्ट करून घेतली. त्यानंतर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. ममताबेन पाटिल यांनी केले. गौरी ढाके व प्रांजल बारी यांनी सूत्रसंचालन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही. पाटील, उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. डी. गोस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात राष्ट्रिय सेवा योजनेचे स्वयंसेवक सागर सोनवणे, आकाश बावस्कर, गोविंदा बावस्कर चेतन,चौधरी, पुरुषोत्तम, गंगा ढाके, गौरी ढाके इ. उपस्थित होते. तसेच इतर प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.

Exit mobile version