Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदीवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आदीवासी एकता परिषदेतर्फे आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल शहरातील तहसीलच्या नवीन प्रशासकीय इमारती समोर राष्ट्रीय आदीवासी एकता परिषद या संघटनेच्या वतीने आदीवासी समाज बांधवांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्याकडे राज्य आणि केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसी धरणे आंदोलन करण्यात आले

 

भारतातील विविध राज्यामध्ये आदीवासी समाजाचे वास्तव्यास असुन आदीवासी समाज हा आपल्या सामाजिक संस्कृती तसेच पाणी , जंगम मालमत्ता व जमीन यांना असंविधानिक मार्गाने संसदेव्दारे कायदा तयार करून आदिवासी बांधवांना त्यांच्या सामाजीक , शैक्षणीक, धार्मीक , राजनितिक व सांस्कृतीक आणी त्यांचे पुर्नवसन अशा विविध रितीरिवाजांना देशात साबुत ठेवण्यासाठी शासनाच्या वतीने ईमानदारी कार्य केले जात आहे. उलट पर्यावरण संरक्षण प्राणी संरक्षण व नॅशलन कॉरिडोअर व भारत माला प्रॉजेक्ट व आदी विषयांच्या नांवाखाली आदीवासी समाज बांधवांची रोजी रोटी संपवण्याचे षडयंत्र शासनाकडून करण्यात असुन या अन्यायच्या विरुद्ध राष्ट्रीय आदीवासी एकता परिषद या संघटनेतर्फे तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन  निवासी नायब तहसीलदार संतोष विंनते  यांना देण्यात आले.

 

याप्रसंगी या आंदोलनात संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष समीर हमजान तडवी ,कुंदन तायडे , पंकज तायडे , ईरफान तडवी , शशीकांत सावकारे, शुभम कापडे , भानुदास महाजन , सागर गजरे , बिलकीस तडवी ,भुषण हातकर , जयवंत कापडे , ईरफान तडवी , रोनक तडवी यांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदविला.

Exit mobile version