Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

वाढीव वीज बिलांबाबतच्या ठिय्या आंदोलनास प्रतिसाद

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांना विरोध करण्यासाठी आज पुकारलेले ठिय्या आंदोलन लॉकडाऊनमुळे झाले नसले तरी याला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील वाढीव वीज बिलांबाबत दि.२७ जुलै रोजी सकाळी अकरा वाजता चोपडा तहसील कचेरीसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परवानगी नाकारल्याने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून तहसीलदार अनिल गावित यांच्या दालनात वीजमंडळाचे अधिकारी श्री. सावकारे यांचेशी विजग्राहकांनी सुमारे एक तास चर्चा केली. परंतु शंकांचे समाधान व निरसन न झाल्याने आंदोलनकर्त्यांनी लॉकडाऊन नंतर आमरण उपोषण करण्याचा इशारा देऊन त्या आशयाचे निवेदन लगेच देण्यात आले. संबंधित अधिकारी यांनी हा विषय शासन स्तरावर पाठविणार असल्याचे सांगितले. निवेदनात तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल रद्द करून प्रतिमास त्या युनिट दरानुसार नवीन वीज बिल देण्यात यावे, तोपर्यंत वीज बिलांची वसुली करण्यात येऊ नये, वीज जोडणी कपात करू नये, ह्या मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असे म्हटले आहे.

याप्रसंगी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी राज्याचे ऊर्जामंत्री ना.डॉ.नितीन राऊत यांच्याकडे स्वहस्ताक्षरात लिहून पाठवलेल्या निवेदनाची प्रत तहसील कार्यालयाकडे पाठवली. तसेच आंदोलनकर्त्यांना भ्रमणध्वनीद्वारे ठिय्या आंदोलन थांबवण्याची विनंती करून यासाठी माझाही पाठिंबा आहे, असे नमूद केले. अशी माहिती आंदोलनाचे प्रमुख जगन्नाथ टी. बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.

याप्रसंगी आंदोलनकर्ते जगन्नाथ टी. बाविस्कर, मधुसूदन बाविस्कर, लखीचंद बाविस्कर, मुरलीधर बाविस्कर, सागर सोळुंके, वैभवराज बाविस्कर यांचेसह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, शहराध्यक्ष के. डी. चौधरी, भाजपाचे पं.स.उपसभापती भूषण भिल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, हातेड बुद्रुकचे माजी सरपंच मनोज सनेर,चोसाका. संचालक अनिल पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकर कन्हैय्ये, नंदकिशोर देशमुख, समाजसेवक शरद बी. पाटील, शामसिंग परदेशी, विजय बाविस्कर, जीवनराव पाटील, आदिवासी भिल्ल समाज संघटनेचे धोंडीराम गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण निकम, शाम नगराळे, सुनील सोनवणे, काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी मधुकर पाटील, रमेश शिंदे, अकबर पिंजारी, इलियास पटेल, सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण शिरसाठ, मोतीलाल रायसिंग, संजय सैंदाणे, सतीश बाविस्कर, भगवान कोळी, गव्हरलाल बाविस्कर, जी.आर.पाटील, विशालराज बाविस्कर, दत्तात्रय पाटील, विनोद पाटील, पवन जैस्वाल, धरमदास पाटील, रामचंद्र बाविस्कर,संजय पाटिल, राजेंद्र पाटील,सुभाष पाटील, अक्षय पाटील, चेतन बाविस्कर,पुष्कराज नेरपगारे, जीवन बागुल, सूर्यकांत चौधरी,विशाल भिल, योगेश बडगुजर,रोहित बडगुजर, दिपक सावळे, दीपक पाटील, विजय धनगर,दीपक परदेशी, सुनील चौधरी, चिंतामण पाटील, भुषण पाटील, रावसाहेब बाविस्कर, किशोर महाजन, योगेश महाजन, रवींद्र पाटील, अभिजित पाटील, मनोज पाटील, हिरालाल बाविस्कर, देविदास बाविस्कर, गोरख पाटील, वासुदेव पाटील, लोटन पाटील, मनोहर पाटील, पंकज कोळी, धोंडू कोळी, विकास कोळी,नरेंद्र पाटील, नाना महाराज यांच्यासह असंख्य विजग्राहकांची उपस्थिती होती.

Exit mobile version