Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तीन दशकांतर दहिगावच्या विद्यालयात भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा – शिक्षकांचे पाणावले डोळे

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घडवून आणला. यावेळी त्यांनी आपल्या विद्यार्थीदशेतील पस्तीस वर्षापूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आज रविवार, दि.१६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याला ३५ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. राज्यभरात विखुरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचे काम तुकाराम सोनवणे आणि डॉ.शोभना तळेले यांनी केले. तीन दशकानंतर आपल्या विद्यार्थ्यांना विद्यालयात पुन्हा पाहून सेवानिवृत्त शिक्षकांचे डोळे पाणावले.

या विद्यार्थ्यांनी मेळावा संपन्न झाल्यावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नागदेवी तीर्थक्षेत्रावर स्नेहभोजनाचा कार्यक्रम घेतला यात ११ विद्यार्थिनी व २४ विद्यार्थी उपस्थित होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, मुख्याध्यापक एस डी चौधरी, सेवानिवृत्त शिक्षक एल एम चोपडे उपस्थित होते.

कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले. मेळाव्यात ‘आपण कसे घडलो आणि कसे शिकत असताना आपल्याला कोणकोणत्या अडचणी आल्यात ?याबाबत अनुभव त्यांनी व्यक्त केले.आगामी काळात शाळेसाठी आपण काहीतरी करू ? असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यक्रमासाठी गोकुळ पाटील, प्रवीण जावळे, पी.बी.पाटील, जे.डी.चौधरी, नंदकिशोर पाटील, सुपडु पाटील, तुकाराम सोनवणे, खतीब तडवी, महेमुद तडवी, महेबुब तडवी, उल्हास बर्डे, धनराज पाटील, भगवान तळेले, सुनंदा पाटील, मिराबाई महेश्री, आशा जावळे, कोकिळा कुलकर्णी, संध्या महाजन, विजया पाटील, ललिता पाटील, सीताबाई पाटील, राजू महाजन, भरत महाजन, भटू पाटील आदी माजी विद्यार्थी व विद्यार्थीनी या प्रसंगी उपस्थितीत होते.

Exit mobile version