Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीला फोडण्याचा डाव !- रोहित पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचा डाव आहे असे दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एका वर्तमान पत्राच्या मुलाखतीतून धक्कादायक आरोप केले आहे. विरोधकांचा आता पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव असल्याचे देखील रोहित पवार यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एका वर्तमानपत्राच्या मुलखतीतून आरोप केले आहेत. शिवसेना पक्षात ज्या पध्दतीने विरोधकांना दोन गट पाडले आहे. त्याच पध्दतीने आता पवार कुटुंबात देखील फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे. शिवसेनेच्या नंतर आता राष्ट्रवादी भक्ष्य स्थानावर असल्याचे शक्यताही रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान पवार कुटुंबात कोणतेही हेवेदावे नसल्याचं देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि मला राज्यात सध्या जे करत आहेत तेच काम करण्याची इच्छा आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल विरोधकांना वाटत असते. परंतू आम्हाला कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही असा टोला देखील रोहित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.

 

Exit mobile version