Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लैगिंक अत्याचार प्रकरणी प्रज्वल रेवन्नानंतर त्याचा भाऊ सुरज रेवन्नालाही अटक

बंगळूरू-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कर्नाटकातील प्रसिद्ध सेक्स स्कँडलमध्ये नवा ट्विस्ट आला आहे. प्रज्वल रेवन्ना व वडिलांवर लैंगिक छळ केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल असतांना आता प्रज्वलच्या भावाचे या प्रकरणी नाव समोर आले आहे. प्रज्वलचा भाऊ सुरज रेवन्नावर अनैसर्गिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रज्वलचा भाऊ सूरजने नोकरी देण्याच्या बहाण्याने एका तरुणीला खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केल्याचे म्हटले आहे. या ठिकाणी महिलेवर जबरदस्ती करत तिच्या इच्छेविरुद्ध चुंबन घेत तिच्या ओठांना आणि मानेला चावे घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सूरजविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे. मात्र, सुरजला ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचा आरोप त्याच्या मित्राने केला आहे. हे पैसे न दिल्याने त्याला या खोट्या प्रकरणात अडकवले जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.

लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेले माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांचा भाऊ जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदार सूरज रेवन्ना यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ जून रोजी सूरजने आपल्या फार्महाऊसवर एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करत पडीतीने शनिवारी हसन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा पोलिस ठाण्यात सूरजविरुद्ध गुन्हा दाखल केला. फिर्यादीत म्हटले आहे की, सूरज रेवण्णाने पीडितेला फार्महाऊसवर बोलवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच सहकार्य न केल्यास जीवे मारण्याची धमकीही सुरजने दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. “सूरजने पीडितेला फार्महाऊसवर धमकावत तुला माझ्या आणि आमच्या कुटुंबाबद्दल माहिती नाही. सहकार्य केले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली,” असे पीडित महिलेने दीलल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडितेने आरोप केला की सूरजने तिचा लैंगिक छळ केला.

या प्रकरणी हसन जिल्ह्याचे एसपी मोहम्मद सुजिथा यांनी या प्रकरणी सांगितले की, “तक्रार मिळाल्यानंतर, आम्ही सूरज रेवन्ना यांच्यावर कलम ३७७ (अनैसर्गिक गुन्हा), ५०६ (गुन्हेगारी धमकी), ३४२ (चुकीच्या पद्धतीने बंदिवासात ठेवणे) आणि ३४ (सामान्य) भारतीय दंड संहिताअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकरणी सुरजने त्याला ब्लॅकमेल केले जात असल्याची तक्रार दाखल केली. दोन व्यक्तिंकडून त्याच्यायर खोटे लैंगिक छळाचे आरोपकरून ब्लॅकमेल केले जात असल्याचे सुरजने म्हटले आहे. या बाबत शिवकुमार यांनी आरोप केला की एका व्यक्तीने सुरुवातीला त्याच्याशी मैत्री केली व आर्थिक नुकसानीचे कारण देत नोकरी मिळवण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. सुरजचा मित्र शिवकुमार याने सांगितले की, आरोप करणारा जेडीएसचा कार्यकर्ता आहे. त्याने सूरज विरुद्ध लैंगिक छळाची खोटी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. दुसरीकडे सूरजने आपल्यावरील आरोप फेटाळून लावत त्यांना राजकीय हेतूने प्रेरित म्हटले आहे.

Exit mobile version