Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

व्यापाऱ्याचे बंद घर फोडून सोडपाच लाखांचा ऐवज लांबविला

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भूसावळ शहरातील पटेल कॉलनी येथील बंद घर फोडून ५ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी ७ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी ८ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, इम्तीयाज मोहम्मद युनूस बागवान वय ४० रा. खडकारोड, पटेल कॉलनी भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. रविवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते.

दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत घरातून ५ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दानिगे चोरून नेले. इम्तीयाज बागवान हे रात्री ८.३० वाजता घरी आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी सोमवारी ८ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर भोये हे करीत आहे.

Exit mobile version