‘भारत जोडो’ यात्रेनंतर कॉंग्रेसचा ‘मेगा प्लॅन’ : लागलीच सुरू होणार अभियान

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारत जोडो यात्रा अंतिम टप्प्यात असतांनाच कॉंग्रेस पक्षाने पुढील अभियानाची तयारी सुरू केली आहे.

कॉंग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर अशी काढलेली भारत जोडो पदयात्रा आता अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे. या पदयात्रेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद लाभल्याने कॉंग्रेसच्या गोटात उत्साहाचे वारे आहेत. या यात्रेनंतर पक्ष हाथ से हाथ जोडो अभियान राबवणार आहे. याच्या नंतर पुन्हा एकदा नवीन मोहिम आखण्यात आली असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल असे समजते.

राहुल गांधी यांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी कॉंग्रेसने योजना आखली आहे. या नव्या योजनेअंतर्गत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी द्वेष, बेरोजगारी, महागाई आणि सर्वसामान्य जनतेशी संबंधित इतर प्रश्नांबाबत पत्र लिहिले आहे. २६ जानेवारीपासून कॉंग्रेस कार्यकर्ते घरोघरी त्यांचा हा संदेश पोहोचवणार आहेत. भारतातील सहा लाख गावांतील १० लाख बुथपर्यंत राहूल गांधींचा संदेश पोहोचवण्याची योजना आहे. दरम्यान, २६ जानेवारीपासून मोहीम सुरू होणार असून ती २६ मार्चपर्यंत चालणार आहे.

Protected Content