Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोठी बातमी : गोंडगावचा खटला चालविण्यास ॲड. उज्वल निकम यांची तयारी !

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गोंडगाव येथील भयंकर दुर्घटनेत चिमुकलीची क्रूर हत्या करण्यात आली असून या प्रकरणी खटला चालवण्याची तयारी विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल यांनी दर्शविली आहे.

 

भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी आज गोंडगाव येथील पिडीत कुटुंबाची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. चित्राताई वाघ यांनी या कुटुंबाशी संवाद साधून त्यांच्या कडून माहिती जाणून घेतली. यात हा नराधम यांचाच शेजारी असून त्यांच्या कुटुंबाशी कोणतेही वाद नव्हते. मात्र या नराधमाने भयंकर कृत्य करून या बालिकेची क्रूर हत्या केली अशी माहिती त्यांना सांगण्यात आली. याप्रसंगी आम्हाला न्याय हवा आणि या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

यानंतर चित्राताई वाघ यांनी ऍड. उज्वल निकम यांना मोबाईलवरून संपर्क साधला. याप्रसंगी श्री. निकम यांनी आपण हा खटला चालवण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. यावर चित्रा वाघ यांनी कायदेशीर बाबींची तात्काळ पूर्तता करून ऍड. निकम हे गोंडगाव येथील बालिकेचा खटला चालविणार असल्याचे सांगितले.

 

दरम्यान, या प्रकरणातील अनेक पैलू हे चित्राताई वाघ यांनी पिडीत कुटुंबाकडून जाणून घेतले. तसेच त्यांनी याप्रसंगी भारतीय जनता पक्षातर्फे सदर कुटुंबाला मदतीचा धनादेश देखील प्रदान केला.

Exit mobile version