Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ॲड. उज्ज्वल निकम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी, अयोध्येत मिळाला राज्य पाहुण्यांचा दर्जा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं राज्यातील प्रसिद्ध सरकारी वकिल उज्ज्वल निकम यांना निमंत्रण आलं होते. जळगावचे मूळ रहिवासी आणि राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड उज्वल निकम यांचाही समावेश केला असून या भव्य दिव्य सोहळ्यात ॲड.उज्ज्वल निकम सहभागी झाले होते.

महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले असून त्यात 506 विशेष निमंत्रित केलं होते. यात जेष्ठ विधीतज्ज्ञ आणि पदमश्री पुरस्कार प्राप्त विशेष सरकारी वकील ॲड उज्ज्वल निकम यांचा समावेश होता. उद्योग, कला, क्रीडा, तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे. त्यात ॲड.उज्ज्वल निकम यांचे समावेश करण्यात आला असल्याने ही उत्तर महाराष्ट्रासाठी सन्मानाची बाब आहे.

हा भव्य, दिव्य आणि नयनरम्य सोहळा पाहण्याची प्रत्येक भारतीयाची इच्छा होती. परंतु जागेअभावी खास निमंत्रितांनाच या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले होते. देशभरातील दिग्गज मंडळी, संत-महंतांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आले असून या सोहळ्यात सहभागी झाल्याचा अतिशय आनंद होत असल्याची प्रतिक्रिया ॲड. उज्वल निकम यांनी बोलताना दिली आहे.

Exit mobile version