Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात आजाराला कंटाळून प्रौढाची आत्महत्त्या

Suicide 580x376

जळगाव, प्रतिनिधी | शहरातील गेंदालाल मिल परिसरात एका प्रौढाने आजाराला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्त्या केल्याची घटना आज (दि. २२) दुपारी ३:१५ च्या सुमारास घडली.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, विकास सुदाम मोरे (वय ४०) पूर्वी मिस्तरी काम करत होते, मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ रहात असल्याने ते घरीच होते. त्यामुळे त्यांनी पत्नी कविता सुदाम मोरे ह्या काम करुन सध्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवत आहेत. दरम्यान, कविता मोरे ह्या कामावर तर मुलगा सौरभ व मुलगी विद्या हे घराबाहेर खेळत असताना विकास मोरे यांनी आजाराला कंटाळून छताला बागायती रुमालाने गळफास घेवून आत्महत्त्या केली. घराबाहेर खेळत असलेल्या मुलांच्या लक्षात ही घटना आल्याने त्यांनी परिसरातील नागरिकांना बोलावले. पोलिसांना खबर मिळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version