Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हृदय विकराच्या झटक्याने प्रौढाचा मृत्यू

death

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवाजीनगर हुडको परिसरात एका प्रौढाच मृतदेह रविवारी सकाळी ७.३० वाजता चिखलात आढळुन आला. चिखलात पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप सुरूवातीला करण्यात आला.  दरम्यान, या प्रौढास हृदय विकराचा झटका आल्याचे निदान शवविच्छेदनाच्या अहवालातून आले आहे.

हरीष तुळशीराम सोनवणे (वय ४५, रा.शिवाजीनगर हुडको) असे मृत प्रौढाचे नाव आहे. सोनवणे हे रेल्वेत गँगमन म्हणून नोकरीस होते. रविवारी सकाळी ७.३० वाजता त्यांचा मृतदेह परिसरातील रस्त्यावर चिखलात आढळुन आला. चिखलात पडल्याने मार लागुन त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप परिसरातील नागरीकांनी केली होता.

दरम्यान, सुमारे दोन तास मृतदेह पडुन होता. यानंतर नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी पोलिसांना माहिती दिली. स्वत: पैसे खर्च करुन हा मृतदेह रुग्णवाहिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्राची सुरतवाला यांनी शवविच्छेदन केेले.

सानेवणे यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे निदान या अहवालातून आले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस हवालदार संजय झाल्टे व पोलिस नाईक दिलीप पाटील तपास करीत आहेत. मृत सोनवणे यांच्या पश्चात आई कुसूमबाई, पत्नी टीना, मुलगा राहुल व मुलगी पुनम असा परिवार आहे.

Exit mobile version