Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात समाजकंटकांकडून अपार्टमेंटमध्ये आग लागण्याचा प्रयत्न

1234

जळगाव प्रतिनिधी । गणपती नगरातील शालीमार हाऊसिंग सोसायटीमध्ये मध्यरात्री दरवाजांवर डिझेल व पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न झाला. याबाबत रामानंद नगर पोलीसात अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणपती नगरातील रोटरी हॉलच्या बाजूला असलेल्या शालीमार को-ऑपरेटीव्ह हौसिंग सोसयटीच्या तिसऱ्या इमारतीत व्यापारी कुटुंबिय राहतात. अपार्टमेंट ही तीन मजली इमारत असून त्यात हरीष विरानदास लखानी (वय – 43), महेंद्र रेणूराम बालेचा (वय-40), गिरीष नमकराम रामणी (वय-30), इंदरलाला गोकूळदास मदनानी (वय -45), दिपक ठाकूरदास ललवाणी (वय-35), दिपक रामचंद संतवाणी (वय-40) आणि अजय ठाकूरदास ललवाणी (वय-38) अशी एकुण सात परीवार राहतात. सोमवारी पहाटे 3.30 वाजेच्या सुमारास सर्वजण दार लावून आत झापलेले असतांना अज्ञात समाजकंटकांनी जुन्या कपड्यावर पेट्रोल व डिझेल टाकून पेटवून दिले. यावेळी अपार्टमेंटमध्ये नातेवाईकांकडे राहणारे गिरीश केवलरामाणी याला जाग आली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान दरवाज उघडताच अज्ञात व्यक्तीने तेथून पळ काढला होता. तीन मजली इमारत असल्याने बेसमेंटला दोन घरे, पहिल्या मजल्यावर तीन तर दुसऱ्या मजल्यावर दोन अशी एकूण सात घरे आहे. यातील पहिला व दुसरा मजल्यापर्यंतच्या दरवाजांना आग लावली होती. तर उर्वरित बेसमेंटच्या घरांना फक्त फडके लावलेली आढळून आली.

हरीष विरानदास लखानी (वय – 43) यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात समाजकंटांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक तपास स.फौ. अनिल फेगडे करीत आहे.

Exit mobile version